Surprise Me!

मनोज जरांगे: चार प्रमाणपत्र रद्द करू नका; सामंतांचा तपासाचा शब्द | Maratha Certificate | Uday Samant

2026-08-07 10 Dailymotion

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. चार प्रमाणपत्रे रद्द करू नयेत आणि ती वैध ठरवावीत, अशी मागणी जरांगे यांनी केली. काही मराठा नोंदी आणि प्रमाणपत्रे रद्द होत असल्याने राज्यात गैरसमज निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

संभाजीनगरमधील प्रमाणपत्रे, जात पडताळणी समितीच्या निर्णयांबाबतही जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केले. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी बोगस ठरवल्या जात आहेत का, असा सवाल त्यांनी केला. तसेच शिंदे यांच्या जवळच्या नेत्यांकडून आपल्या विरोधात बैठका घेतल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

उदय सामंत यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन बावनकुळे आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे सांगितले. चार प्रमाणपत्रे आणि संबंधित व्हिडीओ पाठवण्यास सांगत, संध्याकाळपर्यंत स्वतः फोन करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.

#ManojJarange #UdaySamant #Maratha #MarathaReservation #CasteCertificate #ShindeCommittee #EknathShinde #MaharashtraNews #MarathiNews #AsianetNewsMarathi #politics


तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.